loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड हादरले! पूर्ववैमनस्यातून प्रौढाचा खून; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

खेड (दिलीप देवळेकर) - खेड तालुक्यातील मेटे मोहल्ला परिसरात जुन्या वादातून एका ५५ वर्षीय इसमाची निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शफी अब्दुल्ला वरवटकर असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी खेड पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ६ एप्रिल रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मेटे मोहल्ल्यातील कब्रस्तानजवळील रस्त्यावर ही घटना घडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, मृत शफी वरवटकर यांच्या हृदयाची काही काळापूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली होती. ही बाब माहित असूनही आरोपींनी पूर्ववैमनस्यातून त्यांना गाठले आणि वाद घालण्यास सुरुवात केली. संशयित आरोपी कादिर शमशुद्दीन घारे, गणी ईस्माईल बोट आणि अशरफ महामुद बोट यांनी शफी यांना शिवीगाळ करत त्यांच्या छातीवर हाताच्या बुक्यांनी वारंवार प्रहार केले. तसेच त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या गंभीर मारहाणीत शफी वरवटकर यांचा जागीच मृत्यू झाला.

टाईम्स स्पेशल

या प्रकरणी मयताचे चुलत भाऊ शेखअली हसन वरवटकर (४४) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ३५१ (३), ३५२ आणि ३ (५) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ८९/२०२६ नुसार नोंदवला आहे. ७ एप्रिल रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg