loader
Breaking News
Breaking News
Foto

शिकार्‍यांचीच झाली शिकार मध्यरात्री गोळीबार; तरुणाचा मृत्यू

वैभववाडी : शिकार्‍याच्या बंदुकीतून झाडलेली गोळी लागून एकाचा दुर्दैवीरीत्या मृत्यू ओढवला असून दुसरा युवक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्या शरीरात ११ छरे घुसले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान आमच्यावर मोटरसायकलवरुन आलेल्या अज्ञाताने गोळीबार केला, असा जबाब जखमी तरुणाने दिला आहे. तालुक्यातील आचिर्णेच्या जंगलात मध्यरात्री घडलेल्या या प्रकाराने सारा वैभववाडी तालुका हादला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. सागर सुरेश पाटोळे (वय २६, रा. घाणेगडवाडी, आचिर्णे) असं मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. तर कृष्णा सुरेश कातकर (वय २५) गंभीरित्या जखमी झाला आहे. वैभववाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आचिर्णे गावातील कालव्याजवळ हे तरुण शिकारीसाठी गेले होते. त्याच वेळी हा दुर्दैवी प्रकार घडला. सखल भागात उभे असताना कोणीतरी जनावर असल्याच्या संशयावरून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली होती. या गोळीबारात सागर पाटोळे याच्या चेहर्‍यावर व हातावर गोळ्या लागून त्याचा मृत्यू झाला, तर कृष्णा कातकर यांच्या अंगावर तब्बल अकरा ठिकाणी छरे लागल्याची माहिती आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज सोनावळकर यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा व जबाब घेण्याचे काम केले. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून, जखमी कृष्णा कातकर याच्यावर कणकवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून त्याचा जबाब नोंदवण्याचे काम हाती घेण्यात आले. सायंकाळी उशीरा जखमी तरुणाने आपल्यावर मोटरसायकलवरुन आलेल्या आज्ञात इसमाने गोळी झाडल्याचा जबाब दिला असून अधिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान यापूर्वीही कणकवलीत शिकारीदरम्यान झालेल्या अशाच प्रकारात एकाचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा निष्काळजीपणामुळे जीव गमावण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बेकायदेशीर शिकारीवर आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे शिकारी प्रकरणे जीवावर बेतू लागले आहेत. या सगळ्या घटनेचा पंचनामा वैभववाडी पोलिसांकडून सुरू असून वैभववाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

टाईम्स स्पेशल

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस हवालदार शैलेंद्र कांबळे, धनाजी धडे, अभिजीत तावडे, अजय बिलपे, मोहन राणे,श्री.जांभळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी बुधवारी सकाळी तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयमी साटम यांनी बुधवारी पहाटे घटनास्थळी भेट दिली. त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक, श्वान पथक, ठसे तज्ञ यांच्या पथकानेही घटनास्थळी घेऊन तपासणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg