loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचे संकट, 10 जिल्ह्यात अलर्ट जारी

मुंबई - राज्यातील मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातच आता पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण, हवामान विभागाने आज पुढील 24 तासांसाठी राज्यातील 10 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुणे-मुंबई उपनगरांसह अनेक भागात गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला आहे. पुण्यात मागील दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले होते. अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. तर ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळे फळबागांसह अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

टाईम्स स्पेशल

राज्यात आजही पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg