सावंतवाडी : सावंतवाडी तालुका वकील संघटनेतर्फे आयोजित 'लेक्स डिस्कशन' या व्याख्यानमालेचे सातवे पुष्प नुकतेच येथील दिवाणी न्यायालयात उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयातील 'अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड' अॅड. प्रशांत केंजळे यांनी 'बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ (POCSO) व सर्वोच्च न्यायालयातील प्रक्रिया' या विषयावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. अॅड. केंजळे यांनी पॉक्सो कायद्यातील विविध पैलू उदाहरणांसह स्पष्ट केले. १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या संरक्षणासाठी हा कायदा अत्यंत कठोर आणि लिंग-तटस्थ असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः इंटरनेट हाताळताना आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर न करता, त्याबाबत पोलिसांत तक्रार करावी किंवा ते व्हिडिओ त्वरित डिलिट करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
अन्यथा, अनवधानाने आपणही त्या गुन्ह्याशी संबंधित होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला. तसेच सर्वोच्च न्यायालयातील कार्यपद्धती आणि 'अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड' परीक्षेबाबतही त्यांनी वकिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सिंधुदुर्ग वकील संघटनेच्या वतीने आणि सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. बाळाजी रणशूर व अॅड. दिगंबर गावकर यांनी अॅड. प्रशांत केंजळे यांचे स्वागत केले. यावेळी अॅड. धनंजय पेंडुरकर, अॅड. परशुराम चव्हाण, अॅड. प्रिया गावकर, अॅड. प्रतीक्षा भिसे, अॅड. सायली पेडणेकर, अॅड. साईप्रसाद नाईक, अॅड. स्वप्नील कोरगावकर, अॅड. सुप्रिया केसरकर, अॅड. राहुल मडगावकर, अॅड. वामन निर्गुण, अॅड. सुखानंद सावंत यांसह अनेक वकील आणि विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. अलका कासकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अॅड. बाळाजी रणशूर यांनी मानले. या व्याख्यानमालेतील पुढील व्याख्यान 'फौजदारी खटल्यांमध्ये सरकारी वकिलाची भूमिका' या विषयावर होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध वकील अॅड. अजित भणगे हे शनिवार, दिनांक ४ मे रोजी दुपारी १२:३० वाजता सावंतवाडी न्यायालयात मार्गदर्शन करणार आहेत. या संधीचा लाभ जिल्ह्यातील सर्व वकील आणि विधी विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. बाळाजी रणशूर यांनी केले आहे.






























































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)





































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.