loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे रेल्वे स्थानक मोबाईल चोरट्यांच्या विळख्यात; पावणे दोन लाखांचे ५ मोबाईल फोन लंपास

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दोन दिवसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार ठाणे रेल्वे स्थानकाला मोबाईल चोरट्यांचा विळखा पडल्याचे चित्र दिसत आहे. मागील दोन दिवसात ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात पाच वेगवेगळ्या प्रवाशांच्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद अज्ञात चोरट्याच्या विरोधात करण्यात आलेली आहे. या पाच प्रवाशांचे पावणे दोन लाखाचे मोबाईल चोरटयांनी लांबविलेले आहे. ठाणे लोहमार्ग पोलीस अधिक तपास पोलीस करीत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ठाणे लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ ते ६ एप्रिल २०२६ दरम्यान विविध लोकल गाड्यांमध्ये प्रवास करताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी चेंबूर येथील प्राध्यापक असलेल्या अतुल अनिल रणपिसे (वय ३१) यांचा ४७ हजारांचा मोबाईल तर भांडुप येथील मोहम्मद सरफराज आलम (वय ३७) यांचा ३० हजारांचा मोबाईल व कल्याणमधील विनोद अशोक चिटिमिल्ला (वय ३३), यांचा ३५ हजारांचा मोबाईल तसेच दिव्यातील श्याम सुभाष प्रजापती (वय २४), यांचा ४३ हजारांचा मोबाईल आणि कल्याण येथील शंतनू संतोष कदम (वय २३), यांचा २५ हजारांचा मोबाईल अशा एकूण एक लाख ८० हजारांचे मोबाईल चोरीला गेले आहेत.

टाईम्स स्पेशल

या सर्व घटना लोकलच्या गर्दीच्या वेळीच घडल्या असून प्रवासी डब्यात चढताना किंवा उभे असताना त्यांच्या खिशातील मोबाईल फोन चोरट्यांनी सफाईदारपणे लंपास केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg