loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीकरांची प्रतीक्षा संपणार! ९० लाखांचे अग्निशमन वाहन लवकरच सेवेत दाखल

दापोली (​सागर गोवळे) - दापोली शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत कळीचा ठरलेला अग्निशमन वाहनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली ९० लाख रुपयांच्या अग्निशमन वाहन खरेदीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच हे वाहन दापोली नगरपंचायतीच्या ताफ्यात दाखल होणार आहे. नगराध्यक्षा कृपाताई घाग यांनी या महत्त्वपूर्ण योजनेला गती मिळाल्याची माहिती दिली आहे. ​या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एकूण ९० लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. यामध्ये: ​शासकीय वाटा: ८१ लाख रुपये (९०%),​नगरपंचायत वाटा: ९ लाख रुपये (१०%) ​मे २०२५ मध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. मात्र, दापोलीची भौगोलिक रचना पाहता नगरपंचायतीने १८ जुलै २०२५ रोजी शासनाकडे वाहन खरेदीसाठी थेट परवानगी मागितली होती. शासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने ही प्रक्रिया काही काळ रेंगाळली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​दापोली हे पर्यटनाचे केंद्र असल्याने आणि येथे कोकण कृषी विद्यापीठ असल्याने व्हीव्हीआयपी (VVIP) व राज्यपालांचे दौरे वारंवार होत असतात. सुरक्षेच्या प्रोटोकॉलनुसार अग्निशमन यंत्रणा जवळ असणे अनिवार्य असते. आतापर्यंत आपत्कालीन परिस्थितीत २५ किमी अंतरावर असलेल्या खेड येथून वाहन मागवावे लागत होते, ज्यामुळे मौल्यवान वेळ वाया जात असे. ​नगराध्यक्षा कृपाताई घाग यांच्या नेतृत्वाखाली आणि स्थानिक आमदार नामदार योगेशदादा कदम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या प्रक्रियेतील प्रशासकीय अडथळे दूर झाले आहेत. आवश्यक ती शासकीय पूर्तता लवकरच पूर्ण होणार असून दापोलीला स्वतःची हक्काची अग्निशमन यंत्रणा मिळणार आहे. ​"दापोलीच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता अग्निशमन वाहन ही शहराची मोठी गरज होती. तांत्रिक कारणांमुळे विलंब झाला असला, तरी आता नामदार योगेशदादा कदम यांच्या सहकार्याने ही प्रक्रिया गतिमान झाली आहे. लवकरच हे वाहन शहरात दाखल होईल आणि नागरिकांची सुरक्षा अधिक भक्कम होईल."

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg