loader
Breaking News
Breaking News
Foto

निरवडे येथे आयोजित 'निरवडे महोत्सव २०२६' अत्यंत उत्साहात संपन्न

सावंतवाडी (प्रतिनिधी) - निरवडे महोत्सव आयोजित करून मंडळाने चांगला पायंडा पाडला आहे. शासन सर्वांगीण विकासासाठी झटत असतानाच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन निश्चितच विकसनशील दिशेने वाटचाल ठरणार आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले. यावेळी सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, मंडळाचे अध्यक्ष निखिल माळकर, माजी सरपंच सदा गावडे व मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निरवडे ग्रामस्थ आणि श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला 'निरवडे महोत्सव २०२६' अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. यावेळी उपस्थित राहून आमदार दीपक केसरकर यांनी तोंड भरून कौतुक केले ते म्हणाले, या महोत्सवामध्ये बचत गटांना प्रोत्साहन दिले गेले. गावातील सांस्कृतिक ठेवा महत्वाचा आहे. मंडळाच्या कार्याचे कौतुक केले, अशा महोत्सवांमुळे ग्रामीण संस्कृतीला बळकटी मिळते असे त्यांनी यावेळी नमूद केले.

टाईम्स स्पेशल

हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष निखिल माळकर, सचिव संदेश पोपकर, खजिनदार सुनील माळकर, मार्गदर्शक ओमप्रकाश तीवरेकर, चंदन गोसावी, सचिन माळकर, विशाल पोपकर, नितेश माळकर, चेतन माळकर, विराज पोपकर, संजय माळकर, राजाराम माळकर आदी कार्यकर्त्यांसह गावातील तरुण आणि ग्रामस्थांनी अहोरात्र मेहनत घेतली. संपूर्ण महोत्सवाचे ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन राजा सामंत, निलेश गुरव, बादल चौधरी आणि श्रीधर पाचंगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ओमप्रकाश तीवरेकर यांनी करून या ऐतिहासिक महोत्सवाची सांगता झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg