सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण, बिगरशेती आणि पगारदार अशा सर्व प्रकारच्या सहकारी पतसंस्थांच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी आगामी २३ आणि २४ मे रोजी आंबोली येथे दोन दिवसीय भव्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी ही माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या दीडशेच्या आसपास पतसंस्था ग्रामीण आणि शहरी भागात आर्थिक देवघेवीचे मोठे काम करत आहेत. मात्र, वैयक्तिक पातळीवर काम करताना या संस्थांसमोर अनेक प्रश्न उभे राहत आहेत. या सर्व प्रश्नांना एकत्रित वाचा फोडण्यासाठी आणि जिल्हयातील सर्व पतसंस्थांची ताकद वाढवण्यासाठी हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
सैनिक स्कूल परिसर, आंबोली या ठिकाणी हे एक निवासी अधिवेशन असून यात जिल्ह्यातील पतसंस्थांचे चेअरमन, संचालक, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या दोन दिवसांत विविध विषयांवर सखोल चर्चा आणि मार्गदर्शन सत्रे होतील. यासाठी राज्यभरातील सहकार क्षेत्रातील दिग्गज मंडळी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांचेही या अधिवेशनास पूर्ण सहकार्य व मार्गदर्शन लाभणार आहे. जिल्ह्यातील सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी आणि पतसंस्थांसमोरील आव्हानांना एकजुटीने सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी या अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी केले आहे.






























































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)





































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.