loader
Breaking News
Breaking News
Foto

मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

सावंतवाडी (वार्ताहर) - किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या सावंतवाडीतील तन्मय कृष्णा दळवी या अवघ्या साडेसात वर्षाच्या चिमूरड्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन लाखाची गरज आहे. पैशाअभावी ही शस्त्रक्रिया थांबली असून आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे दळवी कुटुंबीयांनी जिल्हावासीयांसह सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींना मदतीसाठी आवाहन केले आहे. ही तातडीची मदत तन्मयला नवसंजीवनी देऊ शकणार असून त्यामुळे एका कुटुंबाचा भावी आधारही वाचणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तन्मय दळवी मिलाग्रिस मराठी प्रायमरी स्कूलमध्ये इयत्ता दुसरीत आहे. दोन महिन्यापूर्वी त्याच्या पोटात अचानक दुखू लागल्यामुळे स्थानिक डॉक्टरांकडे उपचार केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी कोल्हापूर तसेच गोवा येथे नेल्यानंतर त्याच्या दोन्ही किडन्या पूर्ण क्षमतेने कार्य करत नसल्याचे निदान झाले. त्यासाठी तज्ञ डॉक्टरांनी त्याच्या दोन्ही किडण्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र घरची परिस्थिती गरिबीची असल्याने एवढी रक्कम आणायची कुठून? हा प्रश्न त्यांना पडला आहे. तन्मयचे वडील मोलमजुरु करून उदरनिर्वाह करतात. जमीन अथवा शेतीसह अन्य उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची. आतापर्यंत तन्मयच्या उपचारासाठी दळवी कुटुंबियांनी होते नव्हते ते सर्व संपवले. त्यामुळे सध्या या चिमुरड्या चिन्मयसह त्याच्या आईवडिलांची स्थिती पाहिल्यावर कुणालाही गहिवरून येईल. त्यामुळे तन्मय याच्या चेहर्‍यावरील हास्य पुन्हा फुलविण्यासह त्याच्या कुटुंबीयांच्या आधारासाठी सर्व समाजमनाच्या दातृत्वाची गरज आहे. तन्मयच्या पुढील उपचारासाठी जिल्हावासीयांना मदतीसाठी हाक दिली आहे. ज्यांना तन्मय याच्या उपचारासाठी मदत करावयाची आहे त्यांनी तन्मय कृष्णा दळवी, नमिता कृष्णा दळवी संयुक्त खाते नंबर १४१०११६१००००४९३, आय एफ एस सी कोड -बी के आय डी ०००१४१० बँक ऑफ इंडिया शाखा, सावंतवाडी या खात्यावर जमा करावी तसेच अधिक माहितीसाठी कृष्णा दळवी ८८७९९ १३७९८ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg