loader
Breaking News
Breaking News
Foto

शहरातील थिबापॅलेस परिसरात बिबट्याचा वावर

रत्नागिरी : ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढलेला असतानाच आता शहरातील काही भागामध्येही बिबट्याचा वावर दिसून आला आहे. शहरातील थिबापॅलेस परिसरात शनिवारी पहाटे बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यामुळे या भागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभाग आता बिबट्याचा माग कसा काढणार यावर नागरिकांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील नाचणे आंबेशेतपासून ते अभुदयनगर परिसर, विश्वनगर, थिबापॅलेस या परिसरातील थिबापॉईंटच्या बाजूने झाडी असलेल्या ठिकाणांमध्ये बिबट्याचा वावर आढळून आला होता. विश्वनगर परिसरात कुत्रे व जनावरांवर हल्ला झाल्याच्या घटनाही घडल्या होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काही महिन्यांपूर्वी थिबापॅलेस व निवखोलदरम्यानच्या दाड झाडी असलेल्या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. मात्र त्यावेळी वनविभागाने याला दुजोरा दिला नव्हता. मात्र आता थिबापॅलेस परिसरातील रुपेश सावंत यांच्या घराच्या आवारातच बिबट्याचा वावर शनिवारी पहाटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. कुत्र्यांचा माग काढत हा बिबट्या आल्याचे दिसून आले. यावेळी कुत्र्याच्या भुंकण्याने जागे झालेल्या सावंत यांनी घराबाहेर लाईट लावल्याने त्याने पळ काढला. थिबापॅलेस परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आल्याचे समजताच नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg