loader
Breaking News
Breaking News
Foto

एलईडी लाईट मासेमारीविरोधातील उबाठा शिवसेनेच्या मोर्चाला मच्छिमार संघटनांचा पाठिंबा

मालवण (प्रतिनिधी)- अनधिकृत आणि विनाशकारी एलईडी लाईट मासेमारी आणि डिझेल दरवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे १० एप्रिल रोजी मत्स्य विभागावर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चाला श्रमिक मच्छिमार संघ, श्रमाजिवी रापण संघटना आणि महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती या मच्छिमार संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एलईडी लाईट सारख्या अतिरेकी व बेकायदा मच्छिमारीमुळे समुद्रातील मत्स्य संपत्तीचे व जैवविविधतेचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे पारंपारिक व लहान मच्छिमारांना मासळी मिळेनाशी झाली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधात आम्ही सातत्याने लढा देत असून उबाठा शिवसेनेतर्फे एलईडी लाईट मासेमारी विरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चाला मच्छिमार म्हणून आमचा पाठिंबा आहे.

टाईम्स स्पेशल

पारंपारिक मच्छिमारांच्या हितासाठी काढण्यात येणाऱ्या कोणत्याही मोर्चाला मच्छीमार आमचा पाठिंबाच असेल असे मच्छिमार संघटनांच्या नेत्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या मोर्चात जास्तीत जास्त मच्छिमारांनी सहभागी व्हावे, श्रमिक मच्छिमार संघ अध्यक्ष छोटू सावजी, श्रमजिवी रापण संघटना अध्यक्ष दिलीप घारे, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg