रत्नागिरी - कोकण रेल्वेच्या मार्गावर कार्यरत असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गेल्या वर्षभरात चमकदार कामगिरी करताना प्रवासा दरम्यान ट्रेनमध्ये विसरलेले तब्बल 53 लाख 6 हजार रुपयांचे सामान प्रवाश्यांना परत केले आहे आणि तब्बल तीस हरवलेल्या मुलांना त्यांच्या आई वडिलांकडे सुखरूप पोहोचवण्याची कौतुकास्पद कामगिरी पार पाडली आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर दिवसभरात तीस हून अधिक ट्रेन धावतात. या ट्रेन मधील प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते ती रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांवर. मार्गावर चोवीस तास धावणाऱ्या गाड्यांमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर रेल्वे सुरक्षा बलाचे जवान गस्त घालतात आणि लोकांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी उचलतात. कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या ट्रेनमध्ये अनेकवेळा प्रवासी उतरताना आपले सामान विसरून जातात.
गेल्या वर्षभरात कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागात अशा 141 घटना समोर आल्या आहेत. या सगळ्या घटनांमधून कोकण रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने तब्बल 53 लाख 6 हजार 776 रुपयांचे सामान मौल्यवन वस्तू प्रवाश्यांना परत मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. रेल्वे प्रवासात अनेक वेळा लहान मुले हरवतात किंवा विविध भागातून चुकून या मार्गावरील रेल्वेत चढतात. अशा तीस मुलांना त्यांच्या आई वडिलांपर्यंत सुरक्षित पोहोचवण्याचे काम गेल्या वर्षभरात रेल्वे सुरक्षा बलाने केले आहे. यात 26 मुलगे आणि चार मुलींचा सहभाग आहे. ऑपरेशन नन्हे फरीस्ते अंतर्गत ही कामगिरी करण्यात आली आहे. प्रवाशांची सुरक्षितता सांभाळताना प्रवासात चुकीचे वर्तन करून इतर प्रवाश्यांना त्रास देणाऱ्या व्यक्ती हि अनेक असतात. गेल्या वर्षभरात विनाकारण ट्रेनची चेन खेचून रेल्वे प्रवास विस्कळीत करणाऱ्या 75 जणांवर कारवाई करत रेल्वे सुरक्षा बलाने 48000 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
गोव्यातून कोकण रेल्वेच्या माध्यमातून नेल्या जाणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर ही रेल्वे सुरक्षा बलाची नजर असते. गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या ट्रेन्समधून 38 वेळा अवैध दारू पकडली गेली असून रेल्वे सुरक्षा बलाने 5 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणात आरोपींना ताब्यात घेण्यात हि यश आले. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागात प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाकडून रेल्वे ॲक्ट अंतर्गत विविध 645 गुन्हे दाखल केले गेले असून 5 लाख 76 हजार रुपयांचा दंड करताना दहा आरोपीना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.















































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)








































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.