सावंतवाडी (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस (६ एप्रिल) आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल) यांचे औचित्य साधून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक व राजकीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. "कमळ चिन्ह आणि देशाचे संविधान घराघरात, मनामनात रुजवणार," असा निर्धार भाजप युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेनुसार, ६ एप्रिल रोजी मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर भाजपचा ध्वज सन्मानपूर्वक फडकवण्यात येणार आहे. सकाळी शक्ती केंद्रांवर ध्वजारोहण झाल्यानंतर पक्षाच्या ध्येय-धोरणांचे वाचन केले जाईल. तसेच कार्यकर्त्यांनी ध्वजासोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याचे आवाहन परब यांनी केले आहे.
स्थापना दिनानिमित्त मिठाई वाटप, रुग्णांना फळवाटप आणि उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता विविध ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात येणार आहेत. तसेच सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळे, रुग्णालये, वेंगुर्ला समुद्रकिनारा आणि सावंतवाडीतील मोती तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी भाजप संपर्क कार्यालयात 'संविधान वाचन' कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी, मतदारसंघातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर व अन्य महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन रॅली काढली जाईल. पक्षाच्या सुरुवातीच्या काळात योगदान देणाऱ्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा 'कृतज्ञता सन्मान' सोहळा सावंतवाडीत आयोजित करण्यात आला आहे. नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असे विशाल परब यांनी सांगितले.
सावंतवाडी भाजप संपर्क कार्यालयात "मी भाजपचा-भाजप माझा, निर्धार सेवा आणि समर्पणाचा" या थीमवर आधारित सेल्फी पॉईंट उभारले जाणार आहेत. यासोबतच दशावतार कला आणि विविध क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून पक्षाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा केला जाणार आहे. "भाजप म्हणजे केवळ राजकीय पक्ष नसून राष्ट्रनिर्मितीचा विचार आहे. 'सबका साथ, सबका विकास' या मंत्रासह आम्ही जनतेपर्यंत पोहोचत आहोत." असे भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी म्हटले आहे.






























































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)





































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.