loader
Breaking News
Breaking News
Foto

चाफवलीच्या चाफनाथ मंदिरात 15 रोजी उत्सव

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथील चाफनाथ मंदिरात सालाबादप्रमाणे होणारा चैत्रशिवरात्र उत्सव यावर्षी बुधवार दि.15 रोजी साजरा केला जाणार आहे. या उत्सवानिमित्त या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे . बुधवार दि .15 एप्रिल रोजी सकाळपासूनच चाफवलीच्या पांडवकालीन एका दगडातील या चाफनाथ मंदिरात उत्सवाला मंत्र, जप ,पूजाअर्चा अशा विविध कार्यक्रमानी सुरुवात होणार आहे. या उत्सवानिमित्त मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली जाते .तसेच मंडप डेकोरेशन केले जाते. या मंदिर परिसरातील निसर्ग सौंदर्य मनमोहुन टाकते. नागमोडी धावणारी नदी तिच्या पाण्याचा येणारा खळखळ आवाज, विविध पक्षांची किलबिल, मधमाशांची पोळी,मयूर पक्षांचे दर्शन मनाला एक वेगळा आनंद देऊन जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या दिवशी या मंदिरात मंत्र, जप, छबिना, असे धार्मिक कार्यक्रमसह राजू वळामे आणि सहकारी यांचे सुश्राव्य भजन, रात्रो 10.30 वा. कोकणातील गाजत असलेले हतखंबा जवळील निवळी येथील श्री नवलाई मित्र नमन मंडळ यांचा नमनाचा कार्यक्रम होणार आहे .या दिवशी निसर्ग सौंदर्य आणि भक्तीचा सुरेख मेळ या परिसरात साधला जाणार आहे . गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी परिसरातील भाविकांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन चाळके बंधू आणि चाफवली ग्रामस्थांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg