loader
Breaking News
Breaking News
Foto

राजूभाऊ साळुंके यांचा केरळचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्या हस्ते सत्कार

रायगड (धम्मशील सावंत) - रायगड भाजपचे नेते तथा भाजप महाराष्ट्र डीएनटी मोर्चाचे राज्य महासचिव राजू साळुंके यांनी केरळचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची तिरुवनंतपुरम येथील लोक भवन येथे भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली. या भेटीदरम्यान विमुक्त, भटक्या आणि अर्धभटक्या जमातींच्या (DNT) सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थितीवर सखोल विचारविनिमय करण्यात आला. या घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सकारात्मक संवाद झाला. या बैठकीत भिकू इदाते, केरळ राज्य विमुक्त भटक्या जनजाती विकास परिषदेच्या अध्यक्षा लेथिकाला कैलास, उपाध्यक्ष सी. रामचंद्रम, तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष युवराज मोहिते उपस्थित होते. या भेटीमुळे विविध राज्यांतील डीएनटी समाजाच्या प्रश्नांवर समन्वय साधून ठोस धोरणे आखण्यास चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg