loader
Breaking News
Breaking News
Foto

ऑपरेशन क्लीन-सी: समुद्रात धडक कारवाया… LED माफियांचा खेळ संपला, रत्नागिरीत ‘नो मर्सी’चा इशारा!”

रत्नागिरी - रत्नागिरीच्या समुद्रात अवैध LED मासेमारीविरुद्ध सुरू असलेली ‘ऑपरेशन क्लीन-सी’ मोहीम आता अक्षरशः चित्रपटालाही लाजवेल अशा थरारक टप्प्यावर पोहोचली आहे. जयगड बंदर येथील मध्यरात्रीच्या धाडीत ३ नौका पकडत तुफानी हवामानात १ तास पाठलाग करून एक नौका गाठली, त्यानंतर 3/4/2026 रोजी पहाटे 2:17 वाजता मिरकरवाडा–गणपतीपुळे दरम्यान “भराडी प्रसन्न” जप्त करत अचूक स्ट्राईक केला, पुढे 07/04/2026 रोजी गुहागर-दाभोळ संयुक्त कारवाईत “सफा मरवा-1” पकडत लाखो रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या साखळी कारवायांचा धडाका सुरू असतानाच आज दि. 9 एप्रिल 2026 रोजी मिरकरवाडा बंदरासमोर पुन्हा एकदा थरारक धाड टाकत “हलीमा मरियम” (IND-MH-4-MM-6091) ही नौका अवैध LED मासेमारी करताना रंगेहात पकडण्यात आली. ही कारवाई परवाना अधिकारी रत्नागिरी श्री. चिन्मय संजय जोशी व परवाना अधिकारी साखरीनाटे श्री. पार्थ संदीप तावडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली असून, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक तुषार कर्गुटकर, सुजन पवार तसेच सुरक्षा रक्षक सतीश राठोड, अमित कांबळे व अमोल पिलणकर यांनी समुद्रात थेट धडक देत ही कारवाई यशस्वी केली. विशेष म्हणजे, अत्यंत प्रतिकूल हवामान, तुफानी वारे आणि उंच समुद्री लाटा असतानाही ही कारवाई पूर्णपणे सुरक्षित व यशस्वीरीत्या पार पडली असून, LED नौकेला पळून जाण्याची कोणतीही संधी देण्यात आली नाही. ही संपूर्ण मोहीम महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री यांच्या स्पष्ट सूचनांनुसार तसेच सहआयुक्त महेश देवरे , प्रादेशिक उपायुक्त नागनाथ भादुले आणि सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत अचूक नियोजनाने राबविण्यात येत आहे. या सलग आणि आक्रमक कारवायांमुळे आता अवैध LED मासेमारी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक नौका मालकांनी अक्षरशः ‘स्वतःहून लॉकडाऊन’ स्वीकारत समुद्रात उतरणे टाळले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg