loader
Breaking News
Breaking News
Foto

मोर्ले घोटगेवाडी रस्त्यावर बाहुबली हत्तीची दहशत

दोडामार्ग (प्रतिनिधी) - तिलारी खोर्‍यातील मोर्ले केर गावात पाच हत्तींच्या कळपाची दहशत सुरू आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे काजू हंगाम सुरू आहे. हत्ती काजू बागेत धुमाकूळ घालत आहेत त्यामुळे काही जणांनी काजूची बोंडे मोर्ले घोटगेवाडी रस्ता कडेला टाकली. या काजू बोंडाच्या वासाने कळपातील बाहुबली हत्ती सोमवारी सकाळी चक्क काजू खाण्यासाठी रस्त्यावर येऊन चक्क अर्धा तास रस्ता अडवून ठेवला. यानंतर वन कर्मचारी, हाकारे यांनी त्याला हाकलून लावले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्या अगोदर मोटार सायकल वरून घरी जाताना अचानक बाहुबली रस्त्यावर आला. यामुळे मोटार सायकलला जलद ब्रेक लावल्याने बहीण-भाऊ खाली पडले व किरकोळ जखम झाली. जंगली हत्ती कळपाच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकरी, ग्रामस्थ यांच्यात भिती निर्माण झाली आहे. दोडामार्ग तालुक्यातील हत्ती बाधित गावातील शेतकरी गेल्या २३ वर्षापासून हत्ती मुक्त दोडामार्ग तालुका करा अशी मागणी करुन देखील हत्ती बंदोबस्त झालेला नाही. पण हत्ती उपाययोजना नावाखाली कोटयावधी रूपये चुराडा केला. आजपर्यंत हत्ती बंदोबस्त बाबत मंत्री महोदय, आमदार, वन अधिकारी यांनी केवळ दिशाभूल करण्याचे काम केले असेही बोलले जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg