loader
Breaking News
Breaking News
Foto

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १० एप्रिलला कणकवलीत भव्य दिव्य सोहळा

कणकवली (प्रतिनिधी) - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खास. नारायण राणे यांचा १० एप्रिलला ७४ वा वाढदिवस व अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण सोहळा कणकवली उपजिल्हा रुग्णालय समोरील पटांगणावर सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती असणार आहे. खा. राणेंच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुढील वर्षभर दर महिन्याच्या १० तारिखला सामाजिक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. या निमित्ताने सोनू निगम यांचा हिंदी - मराठी गाण्यांचा लाईव्ह शो असणार आहे. तसेच अभिनेते संजय दत्त यांची देखील उपस्थिती असणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप महिला आघाडी अध्यक्ष श्वेता कोरगांवकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कणकवली पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनु सावंत, भाजप युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, जिल्हा बॅंक संचालक बाळा मोर्ये, संदीप साटम, मिलींद मेस्त्री, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, राजू परुळेकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री, खा. नारायण राणे यांनी महाराष्ट्रासह कोकणसाठी गेले ४ तप अविरत सेवा केली. कोकणचे नाव राज्याच्या नकाशावर साततत्याने विकासात्मक दृष्टीने फडकवत ठेवले आहे, असे सांगताना प्रभाकर सावंत म्हणाले, खा. नारायण राणे यांचा वाढदिवस दरवर्षी उत्सव म्हणून साजरा केला जातो. त्याच पध्दतीने १० एप्रिल रोजी खा. नारायण राणे यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. खा. नारायण राणे यांच्या वाढदिवस ७४ वा आहे. ते अमृत महोत्सव वर्षात पदार्पण करीत आहेत. लोकसभा मतदार संघात हा वाढदिवस साजरा करताना विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम दरमहिन्याच्या १० तारिखला राबवले जाणार आहेत, असे प्रभाकर सावंत यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg