loader
Breaking News
Breaking News
Foto

ओंकार हत्ती महाराष्ट्र-गोवा सीमारेषा ओलांडून गोव्यातील मोपा परिसरात दाखल झाला

बांदा (प्रतिनिधी) - गेल्या आठ-नऊ दिवसांपासून नेतर्डे परिसरात वावरत असलेला ‘ओंकार’ हा हत्ती आज सकाळी गोवा राज्यात दाखल झाला. खडशी-मोपा परिसरातील बागायतीत शिरून त्याने काही ठिकाणी पिकांचे नुकसान केल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, नेतर्डे परिसरात काही दिवसांपासून ‘ओंकार’ हत्तीचा वावर होता. आज सकाळी तो महाराष्ट्र-गोवा सीमारेषा ओलांडून गोव्यातील मोपा परिसरात दाखल झाला. त्यानंतर हत्तीने खडशी भागातील बागायतीत प्रवेश केला असून काही शेतीपिकांचे नुकसान झाल्याची माहिती तेथील शेतकऱ्यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हत्तीच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, गोवा वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, गोवा वनविभागाकडून ‘ओंकार’ हत्तीला पुन्हा जंगलाच्या दिशेने माघारी पाठवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg