loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS- परीक्षा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा 12 एप्रिल रोजी

रत्नागिरी - युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS- परीक्षा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी सकाळी ठीक 10:00 वाजता श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, साळवी स्टाॅप, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे. या बक्षिस वितरण सोहळ्यात विमानाने ईस्त्रो सफरीसाठी निवड झालेले 15 विद्यार्थी, गोवा सायन्स सेंटर भेटी साठी निवड झालेले 10 विद्यार्थी तसेच रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झालेले प्रत्येक इयत्तेतील पहिल्या दहा व तालुका गुणवत्ता यादीत निवड झालेले प्रत्येक इयत्तेतील पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, मेडल्स व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाच्या औचित्याने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या एक प्राथमिक व एक माध्यमिक शिक्षकाला युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवान्वित येणार आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. हा बक्षिस वितरण समारंभ लोकप्रिय आमदार किरण ऊर्फ भैय्या सामंत यांच्या शुभ हस्ते आयोजित करण्यात आला असून या शुभ प्रसंगी विलास चाळके, उपाध्यक्ष जिल्हा परीषद, रत्नागिरी नंदकुमार मुरकर, शिक्षणसभापती जिल्हा परीषद, रत्नागिरी निलिमा नाईक, शिक्षाधिकारी रत्नागिरी, ऋषिकेश भोगले, सर्व प्राथमिक शिक्षक संघटना प्रतिनिधी रत्नागिरी उपस्थित राहणार आहेत, तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश सावंत, सौ.संजना संदेश सावंत माजी जि प अध्यक्ष सिंधुदुर्ग यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सुशांत मर्गज, परीक्षा प्रमुख श्रीधर दळवी, रत्नागिरी जिल्हा समन्वयक यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg