loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबोली परिसरातील वन्यप्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी वनविभागाकडे बॅटरी अन् सोलर लाईटची मागणी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोली मतदारसंघातून पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या मतदारसंघातील ग्रामस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी मायकल डिसोझा यांनी पुढाकार घेतला आहे. आंबोली, गेळे आणि चौकुळ या डोंगरकपारीतील गावांमध्ये हत्ती, वाघ, अस्वल आणि गवेरेडे यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांच्या जीविताला व शेतीला मोठा धोका निर्माण झाला आहे. हा उपद्रव रोखण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी तिन्ही गावांतील प्रत्येक घराला बॅटरी आणि परिसरात सोलर लाईट बसवावेत, अशी आग्रही मागणी मायकल डिसोझा यांनी आज वनविभागाकडे केली. ​शिवसेना पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा यांनी आज सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भातील मागणीचे निवेदन सादर केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आंबोली, गेळे आणि चौकुळ ही गावे घनदाट वनक्षेत्राला लागून आहेत. गेल्या काही काळापासून या भागात वन्यप्राण्यांचे हल्ले आणि शेतीचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे ग्रामस्थांसाठी जिकिरीचे झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांपासून बचाव करण्यासाठी आणि सुरक्षित वावरासाठी तिन्ही गावांतील प्रत्येक कुटुंबाला वनविभागामार्फत दर्जेदार बॅटरी पुरवण्यात यावी.

टाइम्स स्पेशल

सोलर लाईटची सोय करावी .वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या मुख्य ठिकाणी आणि वस्त्यांच्या परिसरात हायमास्ट किंवा सोलर पथदिवे बसवण्यात यावेत, जेणेकरून प्रकाशाअभावी होणारे हल्ले टाळता येतील. ​यावेळी उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. या मागणीमुळे आंबोली परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg