loader
Breaking News
Breaking News
Foto

नावडीचे माजी उपसरपंच संदेश शिवलकर यांचे दुःखद निधन

संगमेश्वर - संगमेश्वर तालुक्यातील उत्कृष्ठ कबड्डीपट्टू आणि हॉलिबॉलपट्टू, नावडीचे माजी उपसरपंच संदेश मनोहर शिवलकर (वय ६१ वर्षे) यांचे काल रात्री दुःखद निधन झाले. बुरंबी येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कै. संदेश यांना खेळाची प्रचंड आवड होती. त्यांनी कबड्डी आणि हॉलिबॉलचे मैदान गाजवले होते. त्यांचे वडील मनोहर शिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गणेश मूर्ती साकारण्याची कला अवगत केली होती. सर्वत्र साच्यातून गणेश मूर्ती घडवल्या जातात परंतु कै संदेश यांचा हाती गणेश मूर्ती घडवण्यात हातखंडा होता. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा ,मुलगी, जावई , तीन भाऊ असा परिवार आहे.. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संगमेश्वरमधील व्यापारी, स्थानिक ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg