loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा आगरवाडी श्री गोपाळकृष्ण मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - शहरातील आगरवाडी येथील श्री गोपाळकृष्ण मंदिराचा अठरावा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात -सकाळी ९ ते १० या वेळेत अभिषेक व मूर्तीपूजेद्वारे होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत श्री सत्यनारायणाची महापूजा पार पडणार आहे. दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसाद, सायंकाळी ७ ते रात्री ८ दरम्यान हरिपाठ (चैतन्य संप्रदाय, आगरवाडी) , रात्री ८ ते ९ या वेळेत ढोलवादन, त्यानंतर रात्री ९ ते १०.३० या वेळेत सत्कार समारंभ पार पडणार असून, रात्री १०.३० वाजता नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथील प्रसिद्ध श्री रवळनाथ रिमिक्स लयभारी नमन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आगरवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन अध्यक्ष प्रमोद आगरे, वाडीप्रमुख काशिराम आगारे, सचिव अजय आगरे आणि सर्व समिती पदाधिकारी , सदस्य,सल्लागार व ग्रामस्थ यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg