ठाणे (प्रतिनिधी) - आजच्या बदलत्या जीवनशैलीत उद्भवणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी नागरिकांनी विज्ञानाची कास धरून आरोग्याकडे सजगतेने पाहणे आवश्यक आहे. 'आरोग्यासाठी एकत्र विज्ञानाच्या साथीने' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रत्येकाने प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वेळेवर तपासणी यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले. ठाणे सिव्हिल रुग्णालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा मध्यस्थी केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीच्या संकल्पनेनुसार, विज्ञानाधारित आरोग्य उपचार आणि सामुदायिक प्रयत्न यांचा मेळ घालण्याच्या उद्देशाने रुग्णालय परिसरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आधुनिक वैद्यकशास्त्राचे महत्त्व आणि निरोगी आयुष्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचा संदेश दिला.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. पवार म्हणाले की, "आरोग्य क्षेत्रात विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे, परंतु त्याचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढे येणे गरजेचे आहे. लहान लक्षणांकडे दुर्लक्ष न करता विज्ञानाच्या आधारे अचूक निदान आणि उपचार घेतल्यास भविष्यातील मोठे धोके टाळता येतील." हातामध्ये विविध प्रबोधनात्मक फलक घेऊन सहभागींनी स्वच्छता, संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबतच शास्त्रीय आरोग्य तपासणीचा प्रभावी संदेश दिला. या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे, ॲड. संदीप येवले, वरिष्ठ सर्जन डॉ. निशिकांत रोकडे, डॉ. अर्चना पवार, विनोद राणे यांसह रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर्स आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नातूनच 'निरोगी शरीर, निरोगी मन' हे ध्येय साध्य होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.











































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)








































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.