ठाणे (प्रतिनिधी) - शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच कोपरी, ठाणे पूर्व येथील रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या प्रकाराने संतापाची लाट उसळली आहे. स्थानकाबाहेरील ग्रीन वाईन्स समोरील परिसरात काही मद्यधुंद तरुणांकडून महिलांची छेडछाड केली जात असल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर शिवसैनिकांनी थेट घटनास्थळी धडक देत संबंधितांना चांगलाच धडा शिकवला. मिळालेल्या माहितीनुसार, कोपरी रेल्वे स्थानकाच्या बाहेर, कॅनरा बँकेच्या परिसरात काही टपोरी तरुणांचा सतत वावर असतो. हे तरुण वाईन शॉपमधून दारू घेऊन उघड्यावरच पित बसतात आणि ये-जा करणाऱ्या महिलांवर अश्लील टिप्पणी करत त्यांना त्रास देत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून वारंवार होत होत्या. मात्र, या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचे धाडस वाढतच होते.
दरम्यान, मार्केट परिसरातून ठाणे रेल्वे स्थानकाकडे जात असताना एका तरुणीसोबत छेडछाड झाल्याची घटना घडली. घाबरलेल्या अवस्थेतही त्या तरुणीने धाडस दाखवत ही माहिती तत्काळ एका व्हॉट्सअप ग्रुपद्वारे स्थानिक शिवसैनिकांपर्यंत पोहोचवली. माहिती मिळताच शिवसैनिक गणेश मुकादम, विकास पाटील, मनीष मुकादम, तुषार परब तसेच शिवसेना उपशहर प्रमुख प्रकाश कोटवानी, रोहित गायकवाड, संतोष बोडके संतोष पांचाळ आणि अन्य कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात शोधमोहीम राबवत संबंधित तरुणांना गाठण्यात आले. यावेळी त्यांच्यापैकी एकाला पकडून शिवसैनिकांनी चांगलाच चोप देत इतरांना इशारा दिला. याचवेळी वाईन शॉपच्या दुकानदारालाही जाब विचारण्यात आला. दुकानासमोरच ग्राहकांकडून दारू पिणे आणि त्यामुळे महिलांना त्रास होणे, हे प्रकार तात्काळ थांबवावेत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी सक्त ताकीद देण्यात आली.
या घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला असला तरी स्थानिक महिलांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे. “अशा प्रकारांना आळा बसणे अत्यंत गरजेचे असून, महिलांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकाराची दखल घेऊन पोलीस प्रशासनानेही संबंधित परिसरात गस्त वाढवण्याची गरज व्यक्त केली असून, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.






.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)













































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.