loader
Breaking News
Breaking News
Foto

माणगाव 10 लाख खंडणी प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा - शरद सावंत

पनवेल : खंडणीसाठी माझा मुलगा ऍड. सिद्धांत सावंत याच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय देण्याचे काम रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे करीत असल्याचा खळबळजनक आरोप शरद सावंत यांनी खारघर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान, माणगाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शरद सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सदर प्रकरणी तक्रारीचे निवेदन राज्याचे पोलीस महासंचालक, उपसंचालक, अलिबाग रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक यांना देखील दिल्याची माहिती शरद सावंत यांनी पत्रकारांना दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शरद सावंत यांनी पत्रकारांना पुढे सांगितले, रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मौजे निळघूण या गावामध्ये माझी मुलगी ऍड. पौर्णिमा सावंत हिच्या मालकीची 137/13अ /3 या सर्वे क्रमांकाची 56 गुंठे शेत जमीन आहे. मूळ शेतकरी बाळकृष्ण शिवराम कदम यांच्या कडून 25 मार्च 2025 रोजी खरेदी केली आहे. शेत जमिनीच्या सरकारी हद्दी प्रमाणे माझा मुलगा ऍड सिद्धात सावंत 24 मार्च 2026 रोजी वॉल कंपाउंड घालण्यासाठी गेला असता वॉल कंपाउंडचे काम करायचे असेल तर 10 लाख रुपये द्यावेत, अशी धमकी देणाऱ्या खंडणीखोरांच्या साथदरांनी हल्ला करीत शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. सदर प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्याकडे लेखी तक्रार केली.

टाईम्स स्पेशल

सदर कामासाठी खंडणी मागणाऱ्या अजित गुगले, भारत पवार व सचिन ऊर्फ चेतन गुगले व त्यांचे इतर साथीदार यांनी या अगदोर देखील खंडणीसाठी धमाकावले होते. तेव्हा देखील 10 मार्च 2026 रोजी पोलीस अधिकारी निवृत्ती बोराडे यांचायकडे तक्रार केली होती. मात्र, सदर व्यक्तीवर कारवाई न केल्याने त्यांनी माझ्या मुलावर शेत जमीन ठिकाणी काम सुरु असताना 24 मार्च रोजी हल्ला करीत पुन्हा खंडणी मागण्याचे धाडस केले. पोलीस अधिकारी निवृत्ती बोराडे यांच्या बेजबाबदारपणामुळे सदर व्यक्तीनी धाडस केले, असे शरद सावंत म्हणाले. सदर प्रकरणामुळे माझे कुटुंब भयभीत झाले असून माझ्या कुटुंबाला धोका निर्माण झाला आहे. सदर प्रकरणी योग्य कायदेशीर चौकशी करून पोलीस अधिकारी निवृत्ती बोराडे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शरद सावंत यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg