मालवण (प्रतिनिधी) - मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यात १९ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या पारंपारिक शिवजन्मोत्सवानिमित्त रिल्स बनविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हि स्पर्धा खुल्या वयोगटासाठी व सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित आहे. रिल्स स्पर्धा दोन टप्यात होणार असून पहिल्या टप्प्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज - युवकांचे प्रेरणास्थान हा विषय असून या टप्प्यातील रील दि. १५ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अपलोड करावे तर दुसऱ्या टप्प्यासाठी शिवप्रभुंची शिवलंक - सिंधुदुर्ग किल्ला हा विषय असून रील दि. १८ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अपलोड करावे. दूसऱ्या टप्प्यातील रिल सिंधुदुर्ग किल्ल्यावर जावून चित्रीत केलेले असावे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचाच स्पर्धेतील क्रमांकासाठी विचार केला जाईल. रील्स अपलोड करताना paramparik shivjanmotsav_kille sindhudurg या इंस्टाग्राम अकाऊंटला फॉलो व कोलॅब करणे बंधनकारक आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्र.- रु. ६००० (नूर्वी हेमराज सावजी पुरस्कृत), द्वितीय क्र. - ४००० (अमित जयप्रकाश वाक्कर पुरस्कृत), तृतीय क्र. - ३००० (हेमंत रामाडे पुरस्कृत) उत्तेजनार्थ प्रत्येकी २ बक्षिसे - रु. १००० (ललित चव्हाण पुरस्कृत) अशी पारितोषिके देण्यात येतील. बक्षीस वितरण समारंभ दि. १९ एप्रिल रोजी सकाळी १० वा. किल्ले सिंधुदुर्ग - शिवराजेश्वर मंदिर येथे पारंपारिक शिवजन्मोत्सव कार्यक्रमात होईल. अधिक माहितीसाठी श्रीराज बादेकर - ७०२०९८८१३२, मोरेश्वर गोसावी- ७०८३२२६०८८, भुषण मेतर- ९१५८९५३९०६, प्रविण पवार- ७५८८९०३१७४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.






























































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)





































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.