मालवण (प्रतिनिधी) : रेवंडी प्रवासी जेटी वर बेकायदेशीररित्या मासे उतरविणे तात्काळ बंद करा. प्रवासी जेटीचा गैरवापर रोखण्यासाठी स्थानिक व परिसरातील इतर ग्रामस्थांना स्पष्ट सूचना देऊन निर्बंध लागू करावेत. अश्या मागणीसह, रेवंडी गावाच्या परिसरातील कालावल खाडीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळूसदृष्य गाळ साचलेला आहे. त्यामुळे खाडीपात्राचे पाणी वारंवार शेत जमिनीमध्ये शिरकाव करत आहे. त्यामुळे गावातील विहिरींचे पाणी खारे होत आहे. शेतजमिनी नापीक बनल्या आहेत. कालावल खाडीपात्रातील वाळू सदृश्य गाळ उपसा लिलाव प्रक्रिया राबवून गाळ उपसा करा. येत्या आठ दिवसात लिलाव प्रक्रिया न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशार रेवंडी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. कालावल खाडीपात्रातील रेवंडी गावासमोरील वाळूसदृष्य गाळ उपसा लिलाव प्रक्रियाव्हावी तसेच रेवंडी प्रवासी जेटीवर बेकायदेशीर रित्या मासे उतरविणे तात्काळ बंद करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी रेवंडी ग्रामस्थानी मालवण तहसीलदार यांची भेट घेतली. मालवण नायब तहसीलदार प्रिया हर्णे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी, माजी सरपंच युवराज कांबळी, सरपंच अमोल वस्त, उपसरपंच श्रद्धा कांबळी, ग्रामपंचायत सदस्य मेघना कांबळी, तंटामुक्ती सदस्य विजय कांबळी, भावेश कांबळी, विराज तळाशीलकर, प्रमोद कांबळी, ओमकार कांबळी, दिलीप मोर्वेकर, राहुल कांबळी, सुरेश गावडे, शैलेंद्र कांबळी, प्रिया कांबळी, शांताराम कांबळी, विनायक कांबळी, शुभा कांबळी, राकेश निवतकर, प्रसाद कांबळी, बाळकृष्ण तळाशीलकर, मिलिंद कांबळी, गोपाळ तळाशीलकर, ओम कांबळी, दिनेश कांबळी, प्रसन्न कांबळी, अनिल वराडकर, संतोष मुणगेकर, सचिन मोर्वेकर, प्रतीक वेंगुर्लेकर, अनिरुद्ध पोयरेकर, संतोष कांबळी, दुर्वास वेंगुर्लेकर, लक्ष्मण कांबळी, प्रथमेश पोयरेकर, जयवंत पोयरेकर, विजया पोयरेकर, सुधीर कांबळी, संजय कांबळी, प्रथमेश करलकर, निलेश वेंगुर्लेकर, निलेश रेवंडकर, प्राजक्ता कांबळी, अश्विनी कांबळी, विवा तळाशीलकर, समीर आचरेकर, संदीप धुळे, किशोर कांबळी, निलेश रेवंडकर, आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेवंडी गावच्या परिसरातील कालावल खाडीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळूसदृष्य गाळ साचलेला आहे. या बाबत यापूर्वीही संबंधित विभागाकडे लेखी विनंती करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात मेरीटाईम विभागामार्फत वाळू मोजणीचा सर्वे देखील पूर्ण झालेला आहे. तरीही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे नैसर्गिक प्रवाहात अडचणीत येत असून गावात पूरस्थिती होण्याची भीती आहे.भरतीच्या वेळी शेतजमिनीत पाणी शिरत असल्यामुळे जमिनी नापीक बनल्या आहेत व शेती नष्ट होत चालली आहे.खाजगी जागांमध्ये खारे पाणी येत असल्यामुळे कांदळवनांचे अतिक्रमण खाजगी जमिनीवर होत आहे. कालावल खाडीपात्राचे पाणी वारंवार शेतजमिनीमध्ये शिरकाव करत असल्याने गावातील विहिरींचे पाणी खारे होत चालले आहे. परिणामी पाणीटंचाई सारखी समस्या गावातील ग्रामस्थांना भेडसावत आहे.अश्या समस्यांचा त्रास रेवंडी ग्रामस्थांना होत आहे: या प्रकाराची तात्काळ दाखल घेऊन रेवंडी गावासमोरील वाळूपट्ट्यातील गाळ उपसाची लिलाव प्रक्रिया राबवून गळ उपसा करण्यात यावा. येत्या आठ दिवसात योग्य निर्णय न झाल्यास रेवंडी ग्रामस्थाच्या वतीने उपोषण छेडण्यात येईल असा इशार देण्यात आला आहे.
रेवंडी कार्यक्षेत्रातील प्रवासी जेटीवर तळाशील येथील मच्छिमारांकडून नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात मासे उतरविण्याचे प्रकार सुरू आहेत. प्रवासी जेटी ही केवळ प्रवासी वाहतुकीसाठी राखीव असताना तिचा गैरवापर करून मासळी वाहतुकीसाठी वापर केला जात आहे. तहसीलदार यांच्या समक्ष तळाशील येथील ग्रामस्थांना बंदर विभाग अधिकाऱ्यांनी जेटी हि प्रवासी जेटी असल्याची स्पष्ट केले आहे. तरीही या बेकायदेशीर मासळी उतरवीलली जाते. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. जेटी परिसरात प्रचंड अस्वच्छता, दुर्गंधी व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मासळीच्या नियमांचे उघड उल्लंघन होणे. हा प्रकार Indian Ports Act 1908 तसेच संबंधित मत्स्यव्यवसाय व स्थानिक प्रशासनाच्या नियमांचे स्पष्ट उल्लंघन असून हा दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे प्रवासी जेटीवरून मासे वाहतूक करण्याचे कृत्य तात्काळ थांबवून तळाशील ग्रामस्थांना लेखी स्वरुपाची सूचना देण्यात यावी. प्रवासी जेटीचा गैरवापर रोखण्यासाठी स्थानिक व परिसरातील इतर ग्रामस्थांना स्पष्ट सूचना देऊन निर्बंध लागू करण्यात यावेत अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.














































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)








































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.