loader
Breaking News
Breaking News
Foto

शहरांमधील घराघरात थेट नळाद्वारे गॅस पोहोचवण्याच्या कामाला मिळणार गती

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील गृहिणींसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गॅस सिलिंडर संपण्याची भीती, त्याचे बुकिंग आणि वितरणाची वाट पाहण्याचे दिवस आता लवकरच संपणार आहेत. केंद्र सरकारने नैसर्गिक वायू वितरणाबाबत घेतलेला महत्त्वाचा निर्णय आता रत्नागिरी जिल्ह्यातही लागू झाला असून, यामुळे शहरांमधील घराघरात थेट नळाद्वारे गॅस (पीएनजी) पोहोचवण्याच्या कामाला मोठी गती मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​जागतिक स्तरावर इंधनाचा पुरवठा विस्कळीत होत असल्याने केंद्र सरकारने २४ मार्च २०२६ रोजी 'नैसर्गिक वायू व पेट्रोलियम पदार्थ वितरण आदेश' जारी केला होता. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने २२ एप्रिल २०२६ रोजी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे रत्नागिरीतील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या क्षेत्रात गॅस पाईपलाईनचे जाळे विस्तारण्यातील सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे आता दूर झाले आहेत. ​सध्या अनेकदा एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने 'पाईप्ड नॅचरल गॅस'वर (पीएनजी) भर दिला आहे. नळाद्वारे मिळणारा हा गॅस एलपीजीच्या तुलनेत अधिक सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणापूरक मानला जातो. एकदा का ही पाईपलाईन तुमच्या स्वयंपाकघरात पोहोचली की, सिलिंडर संपण्याची धास्ती कायमची मिटणार आहे.

टाईम्स स्पेशल

​महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव अनिलकुमार उगले यांच्या स्वाक्षरीने हा आदेश निर्गमित करण्यात आला असून, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकाऱ्यांना याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता जिल्ह्यातील सर्व नागरी भागांत गॅस वितरणासाठी एकसमान कार्यपद्धती राबवली जाणार असल्याने, लवकरच गॅस पाईपलाईनच्या खोदकामाला आणि जोडणीला सुरुवात झालेली पाहायला मिळेल. या नव्या सुविधेमुळे रत्नागिरीकरांचा स्वयंपाकघरातील प्रवास अधिक सुखकर आणि आधुनिक होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg