loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे शहरात शिवशाही एसटी जळून खाक

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे रेल्वे स्टेशनलगत असलेल्या बस डेपोमधून वसई आगाराची बस ठाणे बस स्थानक येथून वसईला जाताना शिवशाही एसटी(MH०९ एम९९४२ )सॅटिस ब्रिजवरती टी एमटी बस स्थानक सॅटिस ठाणे स्टेशन येथे आली असताना शिवशाही एसटीने अचानक पेट घेतला. चालक वाहक यांनी तात्काळ प्रवाशांना बसमधून खाली उतरवले बसमधील कोणत्याही प्रवाशाला सुदैवाने दुखापत नाही. बसने पेट घेतल्यामुळे संपूर्ण बस जळून नुकसान झाले आहे या आगीत शिवशाही एसटी जाळून खाक झाली. या एस टी मधून प्रवास करणाऱ्या १४ सर्व प्रवासी व बसचे चालक व वाहक हे सुरक्षितपणे बसच्या बाहेर आले. शिवशाही बसला लागलेल्या आगीमुळे टीएमटी गाड्यांची वाहतूक ही काही तास ठप्प झाली होती. या घटनेमुळे प्रवाशांची पळापळ सुरू झाली

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वा,य. एम. तडवी सो., ठाणे नगर पोलीस कर्मचारी, ठाणे नगर वाहतूक पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह, ०१-रेस्क्यू वाहनासह, ०१- वॉटर टँकर वाहनासह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१-पिकअप वाहनासह व महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी उपस्थित राहिले. परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg