मालवण (प्रतिनिधी) - मालवण वायरी येथील डॉ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गोरे एज्युकेशन फाऊंडेशन ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत व सिंधू रत्न टॅलेंट सर्च परीक्षेत सुयश मिळविले. जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या गोरे एज्युकेशन फाऊंडेशन ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत रेकोबा माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता नववीतील विद्यार्थी वेद प्रवीण कुबल याने १०० पैकी ८२ गुण मिळवत सिल्वर मेडल पटकावले. तसेच त्याने जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला. तर इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी वेदिका परशुराम लुडबे हिने १०० पैकी ६७ गुण मिळवले. तसेच इयत्ता सातवीमधील केदार महेश मसुरकर व प्राची प्रमोद शेलटकर यांनीही यश संपादन केले.
त्याचप्रमाणे सिंधू रत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत रेकोबा हायस्कुलच्या सहावी व सातवी या दोन्ही वर्गाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.इयत्ता सातवी मधील केदार महेश मसुरकर याने २०० पैकी १०२ गुण मिळवले असून तो 'ब्राँझ ' मेडलाचा मानकरी ठरला. तसेच प्राची प्रमोद शेलटकर, मयुरी सुनील मेस्त्री, तन्वी ललित मेस्त्री, राधिका योगेश आचरेकर, कार्तिक शंकर गोसावी यांनी यश मिळवले. इयत्ता सहावी मधील दिव्या आनंद गावडे हिला ११० गुण, रिधिमा अरुण परकर हिला १०४ गुण मिळाले असून या दोघींना ब्राँझ मेडल प्राप्त झाले आहे. निधी निलेश घारे, हेतल संदीप बोडवे, तन्वी नंदकुमार रासम, आर्या लिलाधर लुडबे, जिया दामोदर घारे,मान्यता देविदास घारे, शोभा दत्ताराम चांदेरकर यांनीही यश मिळविले. या दोन्ही परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रशालेचे शिक्षक प्रवीण कुबल यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक संजय खोचरे, संस्थेचे पदाधिकारी, देवबाग केंद्रप्रमुख राजेंद्र.परब, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.












































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)






































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.