loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवचरित्र स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

खेड (प्रतिनिधी) - श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शिवचरित्र स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या 11 विद्यार्थ्यांची द्वितीय पातळीसाठी निवड झाली आहे. श्री शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित या स्पर्धेमध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. यामध्ये कु. श्रृती खेडेकर, कु. हर्षित कोहापरे व कु. समर्थ माने या विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कु. श्रृती खेडेकर, कु. प्रणव देवकाते, कु. हर्षित कोहापरे, कु. स्पंदन धामणे, कु. प्रणव गांगर्डे, कु. शौर्य गवस, कु. अव्दैत मळंणगावकर, कु. आयुष मयेकर, कु. विभा मानकर, कु. आराध्य मेहता व कु. अर्णव परकाळे या विद्यार्थ्यांची द्वितीय पातळीसाठी निवड झाली आहे. सदर स्पर्धा दिनांक 30 मे रोजी रायगड या ठिकाणी संपन्न होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वरील विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षक ओंकार काष्टे, सौ. सायली मोडक, सौ. प्रिया चिले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वितांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg