चिपळूण - तालुक्यातील कळमुंडी गावच्या बौद्धवाडीतील सर्व ग्रामस्थांनी शिवसेना नेते आणि गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव आणि जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. याआधी आम्ही अन्य पक्षाचे काम करत होतो. परंतु सत्तेत असतानाही आमच्या वाडीचा विकास त्यांच्याकडून होऊ शकला नाही. दुसरीकडे विरोधी पक्षाचे आमदार असतानादेखील तुमच्या माध्यमातून मतदारसंघात सुरू असलेला विकासकामांचा धडाका पाहून आम्ही प्रभावित झालो आणि आमच्या वाडीने एकसंघपणे आपल्या सोबत येण्याचा निर्णय घेतला. यापुढे आपल्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी कायम राहू, असे उद्गार प्रवेशकर्त्यांनी काढले. या सर्वांचे पक्षात स्वागत करताना आमदार जाधव यांनी आपल्या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द दिला.
उमरोली गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद उर्फ पिंट्या निवळकर, युवा सेनेचे तालुका अधिकारी प्रीतम वंजारे यांच्या माध्यमातून हा पक्ष प्रवेश झाला. प्रवेशकर्त्यांमध्ये विकास मोहिते, विजय सावंत, किशोर मोहिते, अनिल मोहिते, श्रीकांत सावंत, सुदेश मोहिते, विश्वदीप सावंत, पंकज सावंत, क्रांतीदीप सावंत, हेमंत सावंत, आशिष सावंत, तुषार सावंत, किरण मोहिते, कुंदन मोहिते, साजन सावंत, रवींद्र सावंत, विकी सावंत, भगवान मोहिते, दिलीप कांबळे, संतोष मोहिते, विनोद सावंत, किरण सावंत, निलेश कांबळे, अशोक मोहिते, शैलेश मोहिते, सचिन सावंत, प्रथमेश कांबळे, नितीन सावंत, अरविंद सावंत, अजय मोहिते, जयेश सावंत, अमोल सावंत, श्रेया सावंत, अर्पिता मोहिते, वैशाली मोहिते, प्रतिभा सावंत, नीता मोहिते, संजीवनी कांबळे, विजया सावंत, अवंतिका मोहिते, भूमी सावंत, प्रेरणा कांबळे आदींचा समावेश आहे. यावेळी तालुकाप्रमुख सुभाष जाधव, उपतालुकाप्रमुख संदीप चव्हाण, लक्ष्मण कोकमकर, उमरोली विभागप्रमुख संदीप घाग, पंचायत समिती सदस्य गौरव पाटेकर, सुप्रिया वंजारे यांच्यासह या विभागातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
















































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.