देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गवरील आंबा घाटातील दक्खन बस थांब्याजवळ एस.टी. व एर्टिका कार याच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत 5 जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी ९.४० वाजण्याच्या सुमारास घडली. प्रल्हाद भिकाजीं शिंदे (वय ५० )राहणार भडकंबा हे आपल्या ताब्यातील एसटी (एम एच १४ बी टी २७५३) खडीकोळवण ते साखरपा अशी घेऊन जात असताना आंबा घाटातील दक्खन बस थांब्याजवळ आली असता समोरून येणारी एर्टिका एम एच ११डी झेड ०३२९ ही गाडी संतोष शिवाजी पवार (वय ५०) राहणार रामनगर सातारा हे रत्नागिरी ते सातारा असे जात असताना दक्खन जवळ आले असता समोरासमोर धडक बसून अपघात झाला.
या अपघातात एस.टी.चालक प्रल्हाद भिकाजी शिंदे हे जखमी झाले तर एसटी प्रवाशी संजय तुकाराम शितप वय ५८, राहणार खाडिकोळवण, एर्टिका चालक संतोष शिवाजी पवार वय ५०, शंभुराज शिवाजी पवार वय १३ रा. रामनगर सातारा श्रीकांत लक्ष्मण मानपुरी वय २७ रा. भिवंडी - ठाणे हे जखमी झाले. जखमीना साखरपा प्राथमिक आरोग्यकेंद्रात आणून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच साखरपा पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीना सुखरूप बाहेर काढले. व वाहतूक सुरळीत केली. पोलीस कार्यवाही सुरु आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश सुतार महिला हेड कॉन्स्टेबल मनस्वी बावस्कर, कॉन्स्टेबल तानाजी पाटील, महिला कॉन्स्टेबल रेश्मा चव्हाण केलं.
















































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.