loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत 'मेगा मेडिकल' शिबिराचा आरोग्योत्सव; ९४७ रुग्णांची तपासणी, तर ३४ चिमुरड्यांच्या 'टू-डी इको' चाचण्या

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असल्याने येथील रुग्णांना अनेकदा तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेसाठी गोवा किंवा मुंबईची वाट धरावी लागते. ही उणीव भरून काढण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सावंतवाडीत आयोजित 'मेगा मेडिकल स्पेशालिटी' तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ९४७ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली असून, अत्याधुनिक चाचण्या आणि शस्त्रक्रियांचा लाभ दुर्गम भागातील जनतेला मिळाला आहे. या आरोग्य महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि सावंतवाडी पालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, नगरसेवक देव्या सुर्याजी, सामाजिक बांधीलकी संघटनेचे प्रा. सतीश बागवे, रोटरी क्लबचे अनंत उचगावकर, श्रीमती विनया बाड यांसह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिबिरात केवळ तपासणीच नाही, तर प्रत्यक्ष उपचार आणि शस्त्रक्रियांवर भर देण्यात आला. महत्त्वाच्या चाचण्या: ९६ प्रौढ आणि ३४ बालकांच्या २डी इको (2D Echo) चाचण्या करण्यात आल्या. याशिवाय ७५ सोनोग्राफी, ३३ सीटी-स्कॅन, ८० ईसीजी आणि ३५९ रुग्णांच्या रक्ताच्या चाचण्या मोफत पार पडल्या. पोटाची एन्डोस्कोपी, हर्नियोप्लास्टी आणि अस्थिव्यंग शस्त्रक्रिया यांसह एकूण ७ तातडीच्या शस्त्रक्रिया या शिबिरात करण्यात आल्या. ४ बालकांना पुढील उपचारांसाठी संदर्भीय (Refer) करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांची मोठी टिम कार्यरत होती. मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. सागर कोल्हे, जनरल सर्जन डॉ. अनिकेत वजराटकर व डॉ. पल्लवी देशमंतार, रेडिओलॉजिस्ट डॉ. हर्षल जाधव, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. निर्मला सावंत, आणि ठाणे येथील केआयएमएस (KIMS) हॉस्पिटलचे बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास. मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटल, डेरवण येथील वालावलकर रुग्णालय, एसएसपीएम (SSPM) हॉस्पिटल आणि आयुष हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनीही आपली सेवा दिली.

टाईम्स स्पेशल

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे इतर जिल्ह्यांतील सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आणि अत्याधुनिक मशिन्स उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. "जिल्ह्यातील दुर्बल व वंचित घटकातील रुग्णांना सर्व सेवा एकाच छताखाली मिळाव्यात, यासाठी हे शिबिर आता दर तीन महिन्यांनी नियमितपणे आयोजित केले जाईल," अशी माहिती यावेळी देण्यात आली. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, डॉ. सुबोध इंगळे यांच्यासह अधिपरिचारिका रश्मी नाईक, सिस्टर दीक्षा वेंगुर्लेकर आणि संपूर्ण नर्सिंग व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg