loader
Breaking News
Breaking News
Foto

निरोगी दात, निरोगी जीवन”; ठाणे सिव्हिल रुग्णालयातून मौखिक आरोग्य जनजागृतीचा शुभारंभ

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे सिव्हिल रुग्णालयात २० मार्च रोजी जागतिक मौखिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करत ३० दिवसीय व्यापक जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली. “निरोगी तोंड म्हणजे संपूर्ण आरोग्याचा पाया” हा संदेश देत सुरू झालेल्या या उपक्रमाद्वारे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नागरिकांमध्ये मौखिक स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे, डॉ. अर्चना पवार, डॉ. शुभांगी अंबाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नियमित दंत तपासणी, योग्य आहार आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे हीच दातांच्या आजारांपासून बचावाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दात आणि हिरड्यांच्या आजारांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, मात्र त्याचे परिणाम संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर होत असल्याने या अभियानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या ३० दिवसांच्या मोहिमेत शासकीय रुग्णालयांबरोबरच शाळा, महाविद्यालये आणि विविध सामाजिक ठिकाणी जाऊन जनजागृती कार्यक्रम राबवले जाणार आहेत. विशेषतः लहान मुलांमध्ये योग्य पद्धतीने दात घासण्याची सवय लागावी, तसेच मौखिक कर्करोग, तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबतही माहिती दिली जाणार आहे.

टाईम्स स्पेशल

ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये या अभियानाअंतर्गत रुग्णांना योग्य पद्धतीने टूथब्रशने दात कसे घासावेत, तोंडाची स्वच्छता कशी राखावी याचे प्रात्यक्षिक दिले जाणार आहे. तसेच येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची दंत तपासणी करून आवश्यक ती प्राथमिक सेवा दिली जाणार असून, मौखिक आरोग्याबाबत सर्व स्तरांत जनजागृती करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg