loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरोली मोरेवाडी जि. प. शाळेला डिजिटल शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम भाजपा नगरसेविका वैभवी खेडेकर यांच्या हस्ते संपन्न

खेड - कोकणातील शाळांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल.! कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार अँड. निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून उपक्रमांतर्गत खेड तालुक्यातील साखरोली मोरेवाडी जिल्हा परिषद शाळांना डिजिटल शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम भाजपा विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर यांच्या हस्ते संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी उपस्थित मा. नगराध्यक्षा उर्मिला उदय पाटणे - शेट्ये, मा. नगरसेविका आशाताई सनगरे, अजय तोडकरी, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, शाळेचे शिक्षक अमोल सकपाळ, साळुंखे व शाळेचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थिनी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत संगणक (CPU), मॉनिटर, प्रिंटर तसेच डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक सर्व साहित्य उपलब्ध करून देत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. डिजिटल इंडिया च्या संकल्पनेला बळ देत गुणवत्तापूर्ण आणि जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg