संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - करजुवे पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित माध्यमिक विद्यालय करजुवे, तालुका संगमेश्वर या प्रशालेचा ४० वा वर्धापन वर्षपूर्ती सोहळा विविध कार्यक्रमांनी व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी चिपळूण- संगमेश्वर चे आमदार शेखर निकम, कृषीभूषण व रत्नागिरी जिल्हा मध्य. सहकारी बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे, माजी खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जि. प. उपाअध्यक्ष विलास चाळके. जि प सदस्य सुशील भायजे, माजी. जि. प. अध्यक्ष रोहन बने, जि. प. सदस्या नेहा माने, वरळी विधानसभा संघटक निरंजन नलावडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य शशिकांत नलावडे, सचिव सूर्यकांत देवस्थळी, माजी सभापती सुभाष नलावडे, दीपक सावंत, पं स. सदस्य महेश जड्यार, श्यामसुंदर माने,राजकुमार मलुष्टे मुख्याध्यापक अशोक कुवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सकाळी आठ वाजता करजुवे-तिसंग ते विद्यालया पर्यंत विद्यालयाची प्रतिमा पालखीत ठेवून सहवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. यानंतर महिलांचे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शेखर निकम, विनायक राऊत, तानाजी चोरगे, रवींद्र माने, निरंजन नलावडे, शशिकांत नलावडे,आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शाळेचे प्रशासन व चाळीस वर्षाच्या खडतर प्रसंगातून शाळेच्या उत्कर्षां विषयी व योगदानाबद्दल संस्थापक अध्यक्ष प्राचार्य शशिकांत नलावडे यांच्या कामांचे कौतुक केले. शाळेच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही आपल्या सोबत असल्याचा विश्वास यावेळी दिला. यावेळी शाळा स्मरणिकेचे उदघाट्न मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच तत्कालीन खासदार विनायक राऊत यांच्या स्थानिक क्षेत्र विकास फंडातून मिळालेल्या वर्ग खोलीचे उद्घाटन विनायक राऊत, तानाजी चोरगे, शशिकांत नलावडे, यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान सुरवातीला संस्थापक अध्यक्षांच्या हस्ते सर्व मान्यवरांना शाल सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शाळा देणगीदार बांधवांचा शाल व सन्मान चिन्ह व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. दुपार सत्रात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला. यावेळी चाळीस वर्षाच्या आठवणींना विद्यार्थ्यांनी उजाळा दिला.
गुरुजनांच्या आशीर्वादाने आमचे जीवन सुखर असल्याचे अनेकांनी भावना व्यक्त केल्या. अनेक माजी विद्यार्थी मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, गोवा, आदी शहरातून शाळेकडे आले होते. रात्री नऊ वाजता शालेय विद्यार्थ्यांचा विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी सर्वांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी नाना कांगणे, शेखर उकिर्डे, विजय धामापूरकर, सतीश नलावडे, चंद्रमोहन नलावडे, प्रशांत विचारे, संतोष डावल, प्रिया नलावडे, सुवर्णा देवस्थळी, रामराव बनसोडे सर्व अध्यापक पालक विध्यार्थी विविध गावचे सरपंच, वाडी प्रमुख, आजी -माजी विद्यार्थी, गावप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिदानंद शिर्के, रवींद्र पवार, सुनील केसरकर, संजय लवंदे यांनी केले आभार सूरज माने यांनी केले.


































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.