loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी येथील दूरध्वनी केंद्रामध्ये चोरटयाचा डल्ला, ४० हजार रुपये किमतीच्या दूरध्वनी साहित्याची चोरी

दोडामार्ग (प्रतिनिधी) - साटेली भेडशी भागात भुरटया चोरी सारख्या घटना वाढत आहेत. असे असताना साटेली भेडशी येथे असलेल्या दूरध्वनी केंद्र ठिकाणी चोरटयाने डल्ला मारून या दूरध्वनी केंद्रातील जवळपास चाळीस हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले यामुळे खळबळ उडाली आहे. या चोरीबाबत प्रल्हाद रामचंद्र पुण्यवंत यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरटया विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

२३ ते २४ मार्च दरम्यान ही चोरी झाली. दूरध्वनी केंद्र येथे गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. साटेली भेडशी येथे दोडामार्ग ते तिलारी मुख्य रस्ता बाजूला दूरध्वनी केंद्र आहे. या ठिकाणी मोबाईल टॉवर तसेच इतर गावातील मोबाईल फायबर केबल जोडली गेली आहेत. या ठिकाणी कुणाचा वावर नाही याचा फायदा घेऊन दूरध्वनी केंद्र साहित्य चोरून नेले. या प्रकरणी अज्ञात चोरटया विरूद्ध ३३/२०२६, अधिनियम व कलम. बीएनएस -३३१(३), ३३१(४), ३०५(श) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रल्हाद पुण्यवंत यांनी दिलेल्या फिर्यादीत २६,४००/- रुपये सी-डीओटी कंपनीचे एकूण २२ मदरबोर्ड प्रत्येकी किंमत बाराशे रुपये मिळून किं. सु १२०००/- रुपये सी-डीओटी कंपनीचे एकूण ६० कार्डस प्रत्येकी किंमत २०० रुपये प्रमाणे मिळून कि. सु एकूण किंमत- ३८,४०० रूपये मुद्देमाल चोरून नेला असे सांगितले.

टाईम्स स्पेशल

दूरध्वनी केंद्रात शिरकाव करून कुणीतरी अज्ञात चोरट्याने वरील वर्णनाचे व किमंतीचे काढून ठेवलेले स्क्रॅपचे साहित्य यातील फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने घरफोडी चोरी करून चोरून नेले. यानंतर याठिकाणी फॉरेन्सिक व्हॅन बोलावण्यात आली. दूरध्वनी केंद्र येथे विनोद कांबळे (उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी) हेमचंद्र खोपडे पोलीस निरीक्षक दोडामार्ग यांनी भेट दिली अधिक तपास नरेंद्र पाटील करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg