loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात नौसीन काझी यांचे निवेदन

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांनी रत्नागिरी नगरपालिकेकडे प्रभाग क्रमांक ४ मधील चर्मालय चार रस्ता ते क्रांतीनगर, कोकण नगर व कीर्तीनगर या मार्गावरील रस्त्यांच्या अत्यंत दुरावस्थेबाबत निवेदन सादर केले. या निवेदनात नमूद करण्यात आले की, संबंधित रस्ता रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, या मार्गावरून विमानतळ, औद्योगिक क्षेत्र तसेच परिसरातील अनेक गावे जोडली गेली आहेत. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून, त्यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या मार्गावर वारंवार अपघात घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना नौसीन काझी यांनी, “रस्ता दुरुस्त न झाल्यास मी तो स्वखर्चाने करून दाखवीन. जर मी स्वखर्चाने करू शकतो, तर प्रशासनाकडे सर्व यंत्रणा असूनही ते का करू शकत नाहीत?” असा सवाल उपस्थित केला. दरम्यान, नगरपालिका मुख्याधिकारी गारवे व पालिका प्रशासनाकडून लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या वेळी निवेदन देताना नौसीन काझी यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते एजाज इबजी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg