loader
Breaking News
Breaking News
Foto

पालशेत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्लास्टिक कचरा युनिटची स्वच्छता करण्याबाबत मनसेचे निवेदन

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील पालशेत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्लास्टिक कचरा युनिटची स्वच्छता करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपतालुकाप्रमुख प्रसाद विखारे यांच्या वतीने ग्रामपंचायत निवेदन देण्यात आले. निवेदनात पुढे म्हटले आहे की, ग्रामपंचायत स्थरावरील प्लास्टिक प्रदूषण बाबत जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती. पालशेत निवोशी ग्रामपंचायतीचा वतीने वाडीवस्तीवर बाजारपेठ परिसरात घनकचरा प्रकल्प सार्वजनिक प्लास्टिक संकलन युनिट कार्यान्वित करून सदर युनिटमध्ये नागरिकांना प्लास्टिक कचरा जमा करण्याचे आव्हान करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामस्थांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला, परंतु संकलन केलेले प्लास्टिक कचऱ्यावर ग्रामपंचायतीने कोणतेही उपाय योजना केलेली दिसून येत नाही. संकलन केलेला प्लास्टिक कचरा आजपर्यंत तसाच युनिटमध्ये आणि आजूबाजूला पडून आहे, त्यामुळे सदर कचरा पालशेत निवोशी परिसरात साथीचे कारण बनत आहे. पावसळ्यात या प्लास्टिक कचऱ्यामुळे डेंगू, मलेरिया, कावीळ यांसारख्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागेल, तरी ग्रामपंचायतीने लवकरात लवकर युनिट मधील कचरा साफ करण्यात यावा. निवेदन देताना उपतालुका अध्यक्ष प्रसाद विखारे, विभाग अध्यक्ष सचिन पालशेतकर, महिला विभाग अध्यक्ष संजयोती पोमेंडकर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg