loader
Breaking News
Breaking News
Foto

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान संघाचा रत्नागिरीत भव्य 'धडक मोर्चा'

दापोली (सागर गोवळे)​ - रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित आणि गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज, २५ मार्च २०२६ रोजी भारतीय किसान संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य 'धडक मोर्चा' काढण्यात आला. सकाळी ११ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली. हातात फलक आणि घोषणाबाजी करत शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. ​दुपारी २ वाजेपर्यंत चाललेल्या या मोर्चानंतर शिष्टमंडळाने माननीय जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यामध्ये खालील महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आंबा पिकाच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी. आंबा आणि इतर पिकांसाठी हवामानातील 'ट्रिगर पॉईंट'मध्ये बदल करावा. तसेच विमा हप्ता भरल्यापासून पुढील हप्त्यापर्यंतचा कालावधी विम्यासाठी ग्राह्य धरावा. आंब्याप्रमाणेच सुपारी आणि मसाला पिकांनाही पीक विम्याचे कवच मिळावे. मंजूर सौर पंप तातडीने बसवण्यात यावेत. सौर पंप सक्तीचा न करता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार 'वन फेज' किंवा 'थ्री फेज' वीज जोडणी उपलब्ध करून द्यावी. तसेच सौर पंपाची सबसिडी थेट शेतकऱ्याला मिळावी. ​शेतकऱ्यांच्या या न्याय्य मागण्यांवर प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी किसान संघाच्या वतीने देण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg