loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा तालुक्यातील एलपीजी पुरवठा प्रश्न सुटला खासदार सुनील तटकरे यांचा मागणीला यश

म्हसळा – रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा तालुक्यातील एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अडचणींची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले होते. अलीकडील काळात एलपीजी पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्यामुळे हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीकडून घरगुती ग्राहकांना शहरी भागासाठी २५ दिवस तर ग्रामीण भागासाठी 45 दिवस आधी गॅस सिलिंडर बुकिंग करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र म्हसळा तालुका हा प्रत्यक्षात शहरी भाग जनगणना नगर असतानाही कंपनीकडून त्याची ग्रामीण भाग म्हणून वर्गवारी करण्यात आली आहे. या चुकीच्या वर्गवारीमुळे म्हसळा तालुक्यातील नागरिकांना 45 दिवस आधी गॅस बुकिंग करावी लागत असून त्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींना सामोरे जावे लागत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पार्श्वभूमीवर खासदार तटकरे यांनी एचपीसीएल च्या अधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हसळा तालुक्याची योग्य त्या प्रमाणे शहरी भाग म्हणून वर्गवारी करण्याची मागणी केली होती. त्यांचा या मागणीला यश आले असून आता 45 दिवसां ऐवजी 25 दिवसांनी गॅस सिलेंडर मिळणार आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील आणि गॅस पुरवठा सुरळीत होणार आहे.खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या मागणीला यश आल्याने नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg