केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून दिनांक २४ मार्च २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र भांबेड, ता. लांजा येथे भव्य 'महा आरोग्य शिबिर परिसरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि आरोग्याची देवता भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या शिबिरामध्ये एकूण ८३ लाभार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला. शिबिरादरम्यान केवळ तपासणीच नव्हे तर विविध शासकीय योजनांची माहिती आणि मार्गदर्शनही करण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने आरोग्य तपासणी, NCD (असंसर्गजन्य रोग) विषयी तपासण्या आणि तज्ज्ञांकडून मार्गदर्शन.शासकीय योजना PM-JAY आणि 'वयोवंदना' योजनेबाबत नोंदणी व माहिती. किशोरवयीन मुली आणि गरोदर महिलांना सकस आहार व पोषणाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जागतिक क्षयरोग दिन : २४ मार्च निमित्त क्षयरोग निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी लांजा पंचायत समितीच्या सभापती मानसी आंबेकर जील्हा परीषद सदस्या विनिता गांगण, जि. प.रत्नागिरी सदस्या मनीषा गणेश लाखण, पंचायत समिती सदस्य शैलेश खामकर, सुतार, वेरवली खुर्दचे सरपंच संतोष खुलम, कोर्ले सरपंच गणेश साळुंखे आणि लांजा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांतकुमार परगे, आझाद विचारे, मिलिंद संसारे, मितीन मयेकर उपस्थित होते.
तसेच डॉ. उमा त्रिभुवणे, डॉ.स्नेहल पाटील, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खामकर, नवयुग उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र लाड, प्रा.आ केंद्राचे सर्व कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. भांबेड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आलेल्या या उत्तम नियोजनाचे उपस्थित मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले.



































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)
























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.