loader
Breaking News
Breaking News
Foto

​भोंदू खरात प्रकरणी आमदार दीपक केसरकर यांच्या चौकशीची मागणी; ठाकरे शिवसेनेचा सावंतवाडीत मोर्चा

सावंतवाडी (प्रतिनिधी) - नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या लैंगिक अत्याचार व अवैध कृत्यांच्या प्रकरणात आमदार दीपक केसरकर यांचे नाव चर्चेत आल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून केसरकर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आज ठाकरे शिवसेनेच्या वतीने येथील प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. ​सकाळी सावंतवाडी संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत प्रांताधिकारी कार्यालय गाठले. यावेळी माजी सभापती रमेश गावकर, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, शब्बीर मणीयार, अशोक धुरी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​मुख्यमंत्र्यांना उद्देशून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिन्नर येथील अशोक खरात याने अध्यात्माच्या नावाखाली महिलांवर केलेले अत्याचार आणि जमवलेली अफाट मालमत्ता यामुळे महाराष्ट्राची संस्कृती डागाळली आहे. या प्रकरणात आमदार दीपक केसरकर यांचे खरातसोबत असलेले निकटचे संबंध समोर आले आहेत. केसरकर यांनी स्वतः या मांत्रिकाकडे जात असल्याची कबुली माध्यमांसमोर दिली आहे. जबाबदार मंत्रीच जर अशा भोंदू मांत्रिकांच्या चरणी लीन होत असतील, तर त्यामुळे अशा गुन्हेगारांना समाजात प्रतिष्ठा मिळते, असे या निवेदनात म्हटले आहे. केसरकर यांच्या पदामुळेच खरातसारख्या प्रवृत्तींना बळ मिळाले असावे, असा संशय निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. ​आर्थिक व्यवहारांची चौकशी: खरातने अल्पावधीत उभी केलेली करोडो रुपयांची मालमत्ता आणि त्यातील राजकीय-प्रशासकीय संगनमताची एसआयटी (SIT) मार्फत चौकशी व्हावी. ​जोपर्यंत या प्रकरणातील राजकीय धागेदोरे स्पष्ट होत नाहीत, तोपर्यंत पीडितांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे केसरकर यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे शिवसेनेने केली आहे. ​या निवेदनाची दखल घेऊन शासनाने पारदर्शक चौकशी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg