loader
Breaking News
Breaking News
Foto

खारघर तळोजा जेल रोड खुंटारी तलावाजवळ नंदकुमार म्हात्रे यांच्या घराला आग

पनवेल - खारघर तळोजा जेल रोड खुंटारी गावातील खुंटारी तलावाजवळ नंदकुमार चंद्रकांत म्हात्रे यांच्या G+2 इमारती च्या पहिल्या मजल्यावरील त्यांच्या घराला आग लागली. सदर आगीवर सिडको अग्निशमन दलाने 1 होजच्या लाईन आणि होजरील होजचा वापर करून रूममध्ये आतून आणि बाहेरून पाण्याचा जोरदार मारा करून आग पूर्णपणे विझवली. सदर आग विझवल्यानंतर जळालेल्या कपाटमधून मौल्यवान दागिने पैसे व इतर साहित्य घरमालक यांना काढून दिले. तसेच किचनमधील एकूण 4 LPG सिलेंडर बाहेर काढण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर आगीमुळे घरातील एसी, बेड, सोफा व इतर साहित्य यांचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगीमुळे थोडे दागिने आणि काही 1 ते दीड लाख रोख रक्कम जळल्याचे घरमालक यांनी सांगितले. तसेच सदर आगीमुळे कोणाला काही इजा झाली नसून आग शॉर्ट सर्किटमूळे लागली असावी, असा अंदाज घरमालक यांनी व्यक्त केला. घरमालक नंदकुमार यांच्या पत्नी लीना नंदकुमार म्हात्रे या पनवेल महानगरपालिका नगरसेविका आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg