केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील अल्पावधीत प्रवाशांच्या पसंतीला उतरलेले कोकण रेल्वे चे वेरवली ब्रूद्रुक हॉल्ट दर्जा असलेले रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी प्रवाशी, नागरिक व वाहनचालकांमधून केली जाते आहे. लांजा तालुक्यात वेरवली बुद्रुक येथे वाहनाची दिवसरात्र वर्दळ असल्याने आणि कोल्हापूर, गोवाकडे जाण्यासाठी सुरळीत रस्ते मार्ग आल्याने वेरवली रेल्वे स्टेशनकडे प्रवाशांचा पाहण्याचा कल वाढत आहे. लांजा-साखरपा-कोल्हापूर तर मुंबई गोवा महामार्ग, व लांजा शहर केवळ ९ ते १० किमी अंतरावर असल्याने व वेरवली येथून नियमित बस फेऱ्या सुरू असल्याने प्रवाशी या स्टेशनला जास्त पसंती देत आहेत. आठ वर्षांपूर्वी वेरवली रेल्वे स्टेशन बांधण्यात आले आहे. मात्र या स्टेशनला हॉल्ट स्टेशन म्हणूनच दर्जा देण्यात आला. या ठिकाणी फलाट व्यवस्था नसून सिग्नल यंत्रणा व क्रॉसिंगसाठी ट्रेन थांबत असतात.
मात्र प्रवाशांच्या व स्थानिक जनतेच्या आग्रहास्तव सावंतवाडी-दिवा तर दिवा-सावंतवाडी या दोनच गाड्या थांबत असतात. या गाड्यांसाठी वेरवली स्थानकातून प्रवाशी संख्या हळूहळू वाढू लागली आहे. गणोशोत्सव, दिवाळी, शिमगोत्सव, उन्हाळी सुट्टी या कालावधीत वेरवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येते. मात्र स्टेशनवर फलाट व्यवस्ताच नसल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन ट्रेनमध्ये चढावे व उतरावे लागते आहे. वाढते प्रवाशी व वाहनांची वर्दळ वाढत असताना स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. काळी खडी, मोठं मोठे दगड आणि कच्चा रस्ता असल्याने वाहन चालवताना चालकांची मोठी तारांबळ उडत आहे. चालणे योग्यही रस्ता नसल्याने प्रवाशी, नागरिक आणि वाहन चाकांमधून नाराजी उमटत आहे. यासह वाढती प्रवाशी संख्येचा विचार करून वेरवली येथे वाहतूकीस योग्य रस्ता व फलाट व्यवस्था उभरावी अशीही मागणी जोर धरत आहे.



































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)
























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.