loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी येथे लाकडाचे ओंडके घेऊन जाणारा डंपर उलटला

साटेली भेडशी (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथील खालचा बाजार परिसरात लाकूड वाहतूक करणारा आयशर डंपर उलटल्याची घटना नुकतीच घडली. मात्र, हा अपघात केवळ तांत्रिक बिघाडामुळे नसून रस्ते कामातील कंत्राटदाराच्या अक्षम्य चुकीमुळे आणि हलगर्जीपणामुळे घडल्याचा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. संबंधित भागात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात कंत्राटदाराने अनेक तांत्रिक चुका केल्या असून, रस्त्याची दुरवस्था आणि अपूर्ण काम यामुळे येथे वारंवार अपघातांचे सत्र सुरू आहे. जड लाकडाचे ओंडके घेऊन जाणारा हा डंपर खराब रस्त्यामुळेच नियंत्रणाबाहेर जाऊन कलंडला, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कंत्राटदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे भविष्यात मोठा अनर्थ घडण्याची भीती निर्माण झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वारंवार होणाऱ्या या अपघातांनंतरही प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत. "कंत्राटदाराच्या चुकीमुळे सर्वसामान्यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे," अशा संतप्त प्रतिक्रिया परिसरात उमटत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदारावर कडक कारवाई करावी आणि रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg