loader
Breaking News
Breaking News
Foto

आडे येथील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमांना भक्तीभावाने जल्लोषात सुरूवात

दापोली (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील आडे येथील श्रीराम सेवा मंडळ आडे श्रीराम ट्रस्ट आडे यांच्या वतीने दरवर्षी श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तीभावाने उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने गुढीपाडव्यापासूनच मोठ्या उत्साहात सुरू झालेल्या कार्यक्रमात श्रीराम सेवा मंडळ आडे यांच्या वतीने धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा, सांस्कृतिक आदी समाजोपयोगी विविध प्रकारच्या भरगच्च असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. या कार्यक्रमांमध्ये बुधवारी २५ मार्च २०२६ रोजी श्री राममंदिरामध्ये सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. श्रीकांत बापट यांच्या सृश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम रात्रौ 11 वाजता श्री सोमजाई देवी प्रासादिक भजन मंडळ ठाणे दिवा रायगड खरसई गुरुवर्य भजन सम्राट बुवा प्रमोद हर्याण आणि भजन सम्राट कानू शितकर बुवा यांचे शिष्य रायगड भुषण सुप्रसिद्ध भजनी बुवा संतोष कानू शितकरबुवा विरुद्ध श्री स्वामी समर्थ संगीत साधना भजन मंडळ भांडूप गुरुवर्य कै.काशिराम परब यांचे शिष्य सुशील गोठणकर यांच्या भजनाचा कार्यक्रम, गुरुवारी २६ मार्च सकाळी १० ते दुपारी १ वाजता श्रीराम जन्मोत्सव व मंदिरात किर्तन, दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजता रथ मिरवणुक व यात्रा, शुक्रवारी २७ मार्च रोजी दुपारी १ वाजता श्रीराम मंदिरात महाप्रसाद, रविवारी २९ मार्च २०२६ रोजी लळीताचे किर्तन, सायंकाळी ५ वाजता भव्य खुलागट चौरंगी कबड्डी स्पर्धा, सोमवारी ३० मार्च रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी ४ वाजता श्रीराम महिला मंडळातर्फे महिलांसाठी श्रीराम मंदिरात हळदी कुंकू, मंगळवारी ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता आडे पाडले समुद्र किनारी बैलगाडी स्पर्धा, श्रीराम सेवा मंडळ आडे व्हाईट वुल्फस प्रोडक्शन निर्मित व दर्जा चॅनल प्रस्तुत अभिजित सावंत लिखित व भुषण बागुल दिग्दर्शित पारुचं कर्तव्य आहे ....! हा सुप्रसिद्ध आणि यशस्वी कलाकारांच्या अभियानातून समृध्द झालेला नाट्य प्रयोग सादर करण्यात येणार आहे. तर २ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जयंती किर्तन पार पडणार आहे. अशा प्रकारे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम सेवा मंडळ आडे यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg