सावंतवाडी : अशोक खरातशी माझी असलेली ओळख ही ईशानेश्वर मंदिरामुळे होती. ते त्या मंदिराचे अध्यक्ष होते. मंदिरात गेलो म्हणून आम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न होत असेल तर मंदिरात जाण साधुसंतांना भेटण मुश्किल होऊन बसेल. अशोक खरातचे व्यक्तिगत जीवन काय आहे ? हे आम्हाला देखील ठावूक नव्हते. पोलिसांनी खरातला अटक केलेली असून कायद्याच राज्य असल्याने त्यांना योग्य ती शिक्षा होईल. आमची नाव त्यात गुंतवायची हा विरोधकांचा फक्त एक डाव असल्याचे मत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, मंदीर असल्याने अनेक लोक तिथे जात होती. मात्र, आता झालेलं प्रकरण हे घृणास्पद आहे. त्यामुळे खरात सोबत केवळ फोटो आहेत म्हणून आमचा संबंध जोडण योग्य नाही. त्यांना वाचवण्यासाठी आम्ही कोणी प्रयत्न केलेले नाहीत. त्यांच्यासाठी पोलिसांना फोनही केले नाहीत. त्यामुळे विनाकारण फोटो असल्याने आरोप करणे चुकीचे आहे. खरात यांचे पीए दीपक लोंढे माझे निकटवर्तीय असल्याच्या चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्या प्रकरणाशी आमचा संबंध जोडण योग्य नाही. संजय राऊत यांना शिवसेनेच्या लढ्यात मी बजावलेली भूमिका रुचलेली नाही. त्यामुळे ते मनात राग ठेऊन माझ्यावर टीका करत आहेत. त्यांची विधान गंभीरपणे घेऊ नयेत असे केसरकर यांनी सांगितले.
तसेच, मंदिरात जाताना मंत्र्यांना सोबत घेऊन गेल्यास चुकीचं काय ? जर असं झालं तर मंदिरात जाण, साधुसंतांना भेटण मुश्किल होऊन बसेल. अशोक खरातचे व्यक्तिगत जीवन काय आहे ? हे आम्हाला ठावूक नव्हते. मंदिरात गेलो म्हणून आम्हाला या प्रकरणात गुंतवल गेल तर यापुढे संतांना भेटण, देवळात जाणं कठीण होऊन बसेल. अशोक खरात यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना योग्य ती शिक्षा होईल, आमची नाव त्यात गुंतवायची हा विरोधकांचा केवळ एक डाव असल्याचे मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले.


































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.